छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे.
छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते.
छांगछुन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!