छत्तीसगढ एक्सप्रेस ही बिलासपूर आणि अमृतसर दरम्यान धावणारी एक जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला छत्तीसगढ या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे नाव दिले आहे. यापूर्वी १९७७ मध्ये 'छत्तीसगड ऑंचल एक्सप्रेस ही बिलासपूर आणि भेापाळमधील हबीबगंज दरम्यान धावत होती. २०१९ साली नवीन बांधलेल्या भोपाळ हबीबगंज रेल्वे स्थानकामधून धावणारी ही पहिलीच गाडी आहे. १९८० मध्ये ती भोपाळ जंक्शन येथील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत जायला लागली. १९८७ नंतर ती हजरत निजामउद्दीन (दिल्ली) तसेच नवी दिल्ली स्थानकांपर्यंत विस्तारली आणि शेवटी १९९० मध्ये ती अमृतसरपर्यंत जाऊ लागली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छत्तीसगढ एक्सप्रेस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.