हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एकानंतर एक अशी चौदा अमूल्य अशा वस्तू म्हणजेच रत्ने बाहेर आली, त्यांना चौदा रत्ने म्हणतात.
लक्ष्मी : विष्णुपत्नी
कौस्तुभ मणी : श्रीविष्णूंनी गळ्यात धारण केलेला मणी. वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.
कल्पवृक्ष - पारिजात वृक्ष -(कल्पद्रुम) प्राजक्ताचे झाड. इंद्रादेवाला प्राप्त झालेला स्वर्गवृक्ष (स्वर्गाच्या बागेत लावलेला वृक्ष).
सुरा वारुणी : दैत्यांचे मादक पेय -दारू, मद्य
धन्वंतरी : देवांचे वैद्यराज
चंद्रदेव :(चंद्रमा) याला शिवाने मस्तकावर धारण केले.
कामधेनू : इच्छापूर्ती करणारी गाय.
ऐरावत : इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
रंभा-मेनका इत्यादी अप्सरागण.
उच्चैःश्रवा : सात तोंडे असलेला अश्व. सूर्यदेवाचे वाहन.
हलाहल विष : कालकूट विषदेवांच्या विनंतीनुसार हे विष शिवाने प्राशन केले .
हरिधनु वा शारंग धनुष्य : भगवान विष्णूचे धनुष्य.
शंख : श्रीविष्णूचा पांचजन्य शंख.
अमृत : देवांचे पेय.
चौदा रत्ने
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.