चॅपेल-हॅडली चषक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चॅपेल-हॅडली चषक ही ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांदरम्यान खेळवली जाणारी एकदिवसीय मालिका आहे. ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू (इयान, ग्रेगरी आणि ट्रेव्हर) आणि न्यू झीलंडचे वॉल्टर हॅडली आणि त्यांची तीन मुले (बॅरी, डेल आणि सर रिचर्ड) ह्या दोन देशांच्या प्रख्यात कुटुंबांच्या नावावरून सदर मालिकेला नाव दिले गेले आहे.

चॅपेल-हॅडली चषक, २०१६ मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केल्यानंतर, सध्या हा चषक न्यू झीलंडकडे आहे.२०१५ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तो सामना चॅपेल-हॅडली चषकासाठी विचारात घेतला गेला नाही (परंतू, गट फेरीतील सामना ग्राह्य धरला गेला आणि त्यामुळे २०१४-१५ चषकाचा विजेता सुद्धा न्यू झीलंड संघ ठरला). ह्याआधी, २००७-०८ पासून सदर चषक सतत ऑस्ट्रेलियाकडेच होता. ऑस्ट्रेलियाने पाच तर न्यू झीलंडने आतापर्यंतर चार मालिका जिंकल्या आहेत.

२००४-०५ पासून २००९-१० पर्यंत चषकासाठी दर वर्षी तीन किंवा पाच सामन्यांची मालिका होत असे आणि २०१०-११ आणि २०१४-१५ विश्वचषकादरम्यान एका सामन्यांच्या मालिकेची नोंद केली गेली. परंतु सध्या सदर मालिका ही वार्षिक स्पर्धा राहिलेली नाही. क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना हा ह्या दोन संघांदरम्यान खेळवला गेला, परंतु तो सामना ह्या चषकासाठी ग्राह्य धरला गेला नाही. २०१७-१८ मोसमातील मालिकेऐवजी ट्रान्स-टस्मान त्रिकोणी मालिका, २०१७-१८ खेळवण्यात येईल, परंतु २०१८-१९ मधील न्यू झीलंड मधील मालिका अपेक्षेप्रमाणे खेळवण्यात येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →