चिन्मयी सुमीत

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

चिन्मयी सुमीत

चिन्मयी सुमित या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटके, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाहिनी मालिकात काम करतात.

चिन्मयी सुमीत यांचा जन्म रवींद्र सुर्वे आणि सुशील सुर्वे यांच्या पोटी 23 सप्टेंबर १९७० रोजी झाला. त्यांचे वडील रवींद्र सुर्वे हे साहित्यिक तथा पुण्याचे माजी आयुक्त असून आई सुशील सुर्वे या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. चिन्मयी सुर्वे या मुळच्या औरंगाबादच्या होत्या. मुंबई येथे 'ज्वालामुखी' या नाटकात काम करत असताना त्यांची सुमित राघवन यांच्याशी ओळख झाली. अल्पकालावधीत त्यांची चांगली मैत्री झाली. सुमित राघवन हे सुरेश वाडकर यांच्या कडून गाणे शिकत असत. सुमीत यांचा गोड आवाज चिन्मयी यांच्या मनाला भावला. कालांतराने मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस सुमित राघवन यांनी गाणं गाऊन चिन्मयी यांना प्रपोज केलं आणि ८ जून १९९६ रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →