माधवी गोगटे (७ ऑगस्ट, १९६४ - २१ नोव्हेंबर, २०२१) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी प्रामुख्याने मराठी नाटक, मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी व हिंदी दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले आहे.
माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी सर्व प्रथम मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९८७ मध्ये सूत्रधार या हिंदी चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. इस १९९० मध्ये अशोक सराफ सोबत त्यांनी घनचक्कर या मराठी चित्रपटात काम केले. यानंतर ‘सत्त्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.
गोगटे यांनी प्रामुख्याने 'भ्रमाचा भोपळा','गेला माधव कुणीकडे','अंदाज आपला आपला' या मराठी नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मराठी नाटके, मराठी-हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकेत काम करत छोट्या पडद्यावर देखील आपली ओळख निर्माण केली. याशिवाय 'स्वप्नांच्या पलिकडले', 'तुझं माझं जमतंय' या मराठी मालिकेत देखील त्यांनी काम केले.
हिंदी दूरचित्रवाहिनी स्टार प्लसवरील 'अनुपमा' या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. कोरोनाची लागण झाल्यामुळे २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गोगटे यांचे मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
माधवी गोगटे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.