चिन्ना पिल्लई

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चिन्ना पिल्लई या तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील, पुल्लीसेरी नामक छोट्याशा गावातील एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी तामिळनाडूमधील खेड्यांमध्ये एक अतिशय यशस्वी बँकिंग प्रणाली सुरू केली आणि महिलांचे सक्षमीकरण करून गरिबी आणि कर्जाच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करणारी एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ती आहे. पुल्लुचेरी या कर्जबाजारी गावातील महिलांमध्ये बचत गटाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा हेतू इतका यशस्वी झाला की लवकरच या प्रदेशात या सम अनेक गट निर्माण झाले. पिल्लई यांच्या समर्पण आणि योगदानामुळे कलंजियम, सूक्ष्म बचतगट चळवळीला मोठी चालना मिळाली, ज्यामुळे गरिबीखाली जगणाऱ्या अनेक महिलांपर्यंत ही योजना पोहोचली.

चिन्ना पिल्लई अशिक्षित आहेत आणि त्या फक्त स्वतःच्या नावाची सही करू शकतात. परंतु केवळ आपल्या वाकचातुर्याच्या कौशल्यामुळे त्या एक नेता म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांनी कामगारांच्या बाजूने लढा लढला ज्यामुळे मालक लोकांच्या लक्षात आले की आता जास्त वेतन देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांना फारसा अनुभव आणि माहित नसताना स्थानिक तलावात मासेमारीचा ठेका घेण्यासाठी बोली लावली. हे पारंपारिकपणे स्थानिक श्रीमंत जमीनमालकांचे राखीव तलाव होते म्हणून जेव्हा त्यांनी हा करार जिंकला तेव्हा त्यांनी पिल्लई वर प्रतिहल्ला केला. या लोकांनी त्यांना आपल्या कामावर घेण्यास नकार दिला. म्हणून मग पिल्लई आणि त्यांचा गट गावाबाहेर कामाला गेला. हा गट आता स्वतःची मत्स्यशेती करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →