चित्पावनी बोलीभाषा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चित्पावनी ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली असली तरी अजूनही गोव्याच्या काही भागात आणि कर्नाटकातील काही भागात विशेषतः कारवार, उडुपी भागात ही भाषा अजूनही काही कुटुंबांत बोलली जाते. हिचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.

चित्पावनी बोलीवर पहिले प्रबळ कार्य करणाऱ्या डॉ. सौ वसुधा भिडे ह्यांनी पुणे विद्यापीठ येथून वर्ष १९८३ मध्ये पी एच डी पदवी "चित्पावनी बोली" ह्या विषयावर अर्जित केली.

कालान्वये अशोक नेने व श्रीधर बर्वे सारखे लेखक पुढे आले, आणि चित्पावनी भाषेत पुस्तके लिहून प्रकाशित केली.

"साद चित्पावनीचो" हा पहिलाच चित्पावनी अंक फेब्रुवारी २०२४ मध्ये गणपुले फौंडेशन (ठाणे) ने प्रकाशित केला आहे.

मागील तीन वर्षांपासून ठाणे येथील गणपुले फाऊंडेशन चित्पावनी बोली भाषेच्या जतना साठी आणि प्रसार करण्यासाठी कार्य करत आहे. श्री. वैभव गणपुले हे गणपुले फाऊंडेशन चे संस्थापक आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये "चित्पावनी भाषेची तोंड ओळख" ही कार्यशाळा गणपुले फाऊंडेशन द्वारे घेण्यात आली. या कार्यशाळेत साधारण ६० व्यक्तींना चित्पावनी बोली बद्दल पूर्णपणे मोफत माहिती देण्यात आली. गोवा, महाराष्ट्र आणि लंडन येथील व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळे नंतर खऱ्या अर्थाने चित्पावनी बोलीचा प्रसार जगभर होऊ लागला.

जानेवारी २०२४ मध्ये, गणपुले फाऊंडेशन द्वारे "साद चित्पावनीचो" ही त्रैमासिक सुरू करण्यात आले. याचे तीन अंक वेबसाइट रूपात प्रकाशित केले जातात आणि दिवाळी विशेष अंक छापील रूपात प्रकाशित करण्यात येतो.

ऑनलाइन अंक सर्वांसाठी मोफत असून विविध साहित्य प्रकार या अंकात प्रकाशित केले जातात. पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून "साद चित्पावनीचो" ऑनलाइन अंक वाचता येईल. https://www.chitpavani.ganpulefoundation.org/saad-chitpavanicho/

२०२६ दिवाळी अंकाची नोंदणी करण्यासाठी गणपुले फाऊंडेशन ला संपर्क करा. https://www.facebook.com/ganpulefoundation/

ही बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे गणपुले फाऊंडेशन तर्फे लहान मुलांना या बोली बद्दल माहिती देण्यात येते. ऑगस्ट २०२४ मध्ये "चित्पावनीचे बोल" ही तीन महिन्यांची लहान मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

"२०३० पर्यन्त प्रत्येक चित्पावन घरात चित्पावनी" हे ध्येय समोर ठेवून गणपुले फाऊंडेशन सध्या कार्य करत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →