चारुदत्त गोविंद आफळे (जन्म : )हे एक मराठी कीर्तनकार आणि गायक अभिनेते आहेत. ते मराठीतले बी.ए.आणि संगीतातले एम.ए. आहेत
त्यांचे वडील कै. गोविंदस्वामी रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) आणि इतर पूर्वज हेही कीर्तनकार होते. गोविंदस्वामींची ’आम्ही आहो बायका’, ’तू बायकोना त्याची?’,’प्रतापगडाचा संग्राम’आणि ’बैल गेला झोपा केला’ही चार नाटके रंगभूमीवर आली होती.
चारुदत्तांनी फारशी नाटके लिहिली नसावीत, पण शालेय वयापासूनच ते नाटकांत कामे करीत आले आहेत. ज्या थोड्या संगीत आणि गद्य नाटकांत त्याची कामे गाजली ती नाटके --
संगीत आतून कीर्तन वरून तमाशा
इथे ओशाळला मृत्यू
संगीत कट्यार काळजात घुसली
संगीत कान्होपात्रा
तो मी नव्हेच
संगीत मत्स्यगंधा
संगीत मानापमान
संगीत लावणी भुलली अभंगाला
संगीत विद्याहरण
संगीत शाकुंतल
संगीत संशयकल्लोळ
संगीत सौभद्र
या नाट्यसेवेसाठी चारुदत्त आफळे यांना अनेक सन्मान मिळाले.
चारुदत्त आफळे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.