कीर्तनकार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लिम, शीख, मारवाडी ही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.

प्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →