डॉ. ॲना शूल्ट्झ या जन्माने अमेरिकन असून मराठी-इंग्रजीत कीर्तन करणाऱ्या स्त्री-कीर्तनकार आहेत.
चापूनचोपून नेसलेली नऊवारी, कपाळाला लावलेला बुक्का आणि गळ्यामध्ये असलेल्या टाळांचा नाद करणाऱ्या ॲना शूल्ट्झ या मराठी आणि संस्कृतमध्ये पदे गात कीर्तन रंगवतात. गायलेल्या पदांचे विवेचन करणारे आख्यान मात्र त्या इंग्रजीमध्ये करतात.
महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तनाच्या परंपरेमध्ये हा अभिनव प्रयोग करणाऱ्या कीर्तनकार डॉ. अॅना शूल्ट्झ यांनी कीर्तन या विषयातल्या पीएच.डी. आहेत.
मूळच्या न्यू यॉर्क येथील अॅना या 'इंडियन स्टडीज' म्हणजेच 'भारतीय संस्कृती' या विषयाचे अध्यापन करीत आहेत.
ॲना शूल्ट्झ
या विषयावर तज्ञ बना.