चंद्रपूर (आधीचे रुढ नाव चांदा/लोकपूर) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली.
चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणूनही ओळखले जात असे, त्यालाच चांदाही म्हणत असत.
११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता, त्यानुसार याचे नाव चांदा हे नांव बदलून चंद्रपूर असे करण्यात आले.
शहरात शंकराचे (अंचलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत.
येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे.
या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.
चंद्रपूर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.