घबाडकुंड

या विषयातील रहस्ये उलगडा.

घबाडकुंड (अर्थात:गुप्त खजिन्याची विहीर) हा २०२६ चा भारतीय मराठी चलचित्रपट असून हा साहस, धाडस आणि थरारक रहस्यपट प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आहेत, तर डॉ. रसिक कदम (आयकॉन डी स्टाईल प्रा. लि.) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर आणि शशांक शेंडे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील ही एक नवीन 'सिनेमॅटिक युनिव्हर्स' (चित्रपट मालिका) संकल्पना असून, हा तिचा पहिला भाग आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात ४ कोटी १४ लाख रुपयांची कमाई केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →