घडशी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

घडशि या समाजाबद्दल माहिती देताना या शब्दांच्या व्युत्पत्ती कडे लक्ष द्यायला हवे. घडशी हा शब्द मूळ गडवाशी या शब्दाचा अपभ्रंश आहे. या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा सनई व चर्मवाद्य वाजवणे होता. पूर्वीच्या काळी सनईवादन हे फक्त राजे राजवाडे गड-किल्ल्यांवर व राजे महाराजांच्या दरबारी होत असे. या बहुतेक प्रसंगी सनई मंगल वाद्य वाजवायचे सेवा मिळाल्यामुळे सदर जातीचे लोक गडापासून जवळच्या अंतरावरच किंवा गडावरच राहत असत म्हणून त्यांना गडवासी हे नाव मिळाले होते. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन घडशी ही जात नाम ओळखली गेली. शिवकालीन समाजरच ने मध्ये समाजात जसे बारा बलुतेदार होते तसेच त्या वेळी त्यांना समांतर व्यवस्था असणारे बारा व त्यापेक्षा जास्त आलुतेदार जात समूह होता. त्यामध्ये घडशी ही जात प्रामुख्याने उल्लेख केलेली आहे.

परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्रात असणारा घडशी समाज हा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, रायगड, कर्नाटक, गुजरात मधील काही भागात अल्प व अत्यल्प स्वरूपात विखुरलेला दिसून येतो.

परंतू कोकण भागामध्ये घडशी हे आडनाव मराठा जातीमध्ये समाविष्ट आहे.

घडशी ही महाराष्ट्रात आढळणारी एक जात आहे बलुते पद्धती मध्ये ही घडशी जात ही मंगलवाद्य सनई चौघडा वाजविण्याचे काम करत तर काही ठिकाणी या जातीच्या लोकांना गावातील पुरातन मंदिरात देवाच्या पादुका च्या पुजेचा मान होता तो अजून आहे या मध्ये प्रामुख्याने जेजुरी, जावली, शिखर शिंगणापुर, म्हसवड , चोरांबे, निनाम पाडळी, खिद्रापूर , नृसिंहपुर, हंगेवाडी, वाडे बोल्हाई, खरसुंडी, औंध , हिठणी ,मंगसुळी,(कर्नाटक) अंकोली, कोळे, नातेपुते तरंगफळ वळई जांभुळणी येथे घडशी समुदाय कडे देवाची पुजा तसेच सनई चौघडा च्या सेवेचा परंपरागत मान आहे तसेच यातील काही कुळे ही परंपरागत राजेरजवाडे येथे मंगल वाद्य सनई चौघडा नौबत वाजवत तर काही राजदरबारी संगीत सेवा देत होती कालांतराने ही राजघराणे खालसा झाल्या मुळे ही पद्धत बंद झाली , देवाच्या सेवेच्या बदल्यात या समुदायाला पूर्वीच्या शासकां कडून इनामी जमिनी देऊ केल्या होत्या त्यास घडशी वतन असे म्हणत होते तसेच इचलकरंजी व कुरुंदवाड येथील घडशी कुळे ही पीर बाबा चे सेवे करी आहेत

आळंदी,कोल्हापूर,जेजुरी,पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर,शिर्डी,फलटण, जावली महाबळेश्वर सातारा,कराड,बारामती,म्हसवड,वळई-जांभूळणी, वाडे बोल्हाई , धुळदेव, कांबळेश्वर, आचरा,रामेश्वर,कणकवली,पुणे,वीर,भोर, सासवड,सोमेश्वर,करंजे, मुरूम,भुईंज,पाचवड,वाई,महाबळेश्वर,हुमगाव,इचलकरंजी,नातेपुते,तरंगफळ,माळीनगर,सांगली,शिराळा, नरसिंहवाडी,कुरुंदवाड,पेठ्नाका,माजगाव, निनामपाडळी, कोरेगांव तसेच महाराष्ट्रमधे वेगवेगळ्या ठिकाणी घडशी समाज वास्तव्य करतो

भोसले, जाधव, कदम, मोहिते, मोरे, पवार, वाडेकर, साळुंके, साळुंखे, धुमाळ, चव्हाण, जगताप , इत्यादी आडनावे या समुदायात आढळतात...



पहा : गावकामगार

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →