फलटण तालुका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हणले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात. फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत्रात प्रगत असून नीरा उजवा कालवा सिंचन योजना ही तेथील कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरला आहे.

बाणगंगा नावाची एक नदी फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसऱ्या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे असते. पुण्याहून फलटणला जाताना आधी मलठण लागते.

फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी आसे देखील म्हणतात. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनलोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे.

फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते. मराठी फिल्मसृष्टीत नावलौकिक मिळवणारा फलटणकरांचा "बिरोबा फिल्म्स" निर्मित "होऊ दे जरासा उशीर" नावाचा चित्रपट ऑस्करच्या जागतिक फिल्म्स फेस्टिव्हलला पाठवला गेला होता. फलटण तालुक्यात राजुरी गावामध्ये 'सांगते ऐका' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. राममंदिर येथेही चित्रपटांचे व टी व्ही मालिकांचे शूटिंग होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →