ग्लोबल टीचर प्राइज (वैश्विक शिक्षक पुरस्कार) हा वर्की फाऊंडेशनद्वारे $1 दशलक्ष (७ कोटी पेक्षा अधिक) रकमेचा दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा शिक्षकास दिला जातो ज्याने शिक्षणात उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशिष्ट निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षकांची नावे जगभरातील लोकांसाठी खुली आहेत आणि शिक्षकदेखील त्यांची नामांकने देऊ शकतात. हे ग्लोबल टीचर प्राइस अॅकॅडमीद्वारे दिले जाते, ज्यात प्रमुख शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, समालोचक, पत्रकार, सार्वजनिक अधिकारी, तंत्रज्ञान उद्योजक, कंपनी संचालक आणि जगभरातील शास्त्रज्ञ यांचा समावेश आहे. या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपयांहून अधिक आहे.
३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. या पुरस्कारासोबतच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं.
ग्लोबल टीचर प्राइज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.