स्वामी गोविंद देव गिरि महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास हे भारतातील एक आध्यात्मिक गुरू आहेत. अनुयायांमध्ये ते स्वामीजी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव किशोर मदनगोपाल व्यास असे आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ते कोषाध्यक्ष आणि मथुरा कृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. स्वामी गोविंददेवगिरि महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक तसेच रामायण, भगवदगीता आणि इतर प्राचीन ग्रंथांवरील त्यांच्या प्रवचनांसाठी ओळखले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोविंद देव गिरि महाराज
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?