नामदेवशास्त्री सानप हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार असुन त्यांचें सुरुवातीचे शिक्षण आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत झाले.त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या न्यायशास्त्राच शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज द्वादशदर्शनाचार्य आंनदवन आश्रम कांदिवली मुंबई गुरुकुल पद्धतीने ९ वर्षे शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापिठाची 'न्यायाचार्य' ही पदवी संपादन केली तसेच पुणे विद्यापीठातुन एम ए(मराठी) करून 'वारकरी संतांची कुटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातुन पि एच् डी संपादन केली. भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली असून ज्ञानेश्वरी व संस्कृत चे अध्ययन-अध्यापन चालू आहे पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत "त्यांची किर्तन व प्रवचन" ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुनयात मानसिक समस्येचे समाधान आहे. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचा मोठा विकास केला आहे. आळंदी, पंढरपूर, पैठण व औरंगाबाद या ठिकाणी भगवान गडाचे मोठे मठ त्यांनी ऊभारले आहेत. तसेच भगवान गड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असुन वारकरी शिक्षण देणारे ज्ञानेश्वरी विद्यापीठ २००४ साली स्थापण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नामदेवशास्त्री सानप
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.