गोवा, दमण आणि दीव विधानसभेची निवडणूक, १९७२ ही भारतातील केंद्रशासित प्रदेश गोवा, दमण आणि दीवमध्ये, तेथील विधानसभेसाठी ३० सदस्य निवडण्याकरिता घेण्यात आली होती. पुन्हा दयानंद बांदोडकर यांच्या सत्ताधारी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने १८ जागा जिंकून विजय मिळवला व बांदोडकर हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. युनायटेड गोवन्स पार्टीने १० जागा जिंकल्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दमणची एक जागा जिंकली. दीवची एक जागा अपक्ष नेत्याने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवा, दमण आणि दीव विधानसभा निवडणूक, १९७२
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?