गोयानिया (पोर्तुगीज: Goiânia) ही ब्राझील देशाच्या गोयाएस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गोयानिया शहर १९३३ साली कृत्रिम रित्या वसवले गेले व गोयाएस राज्याची राजधानी येथे हलवली गेली. गोयानिया ब्राझीलची राष्ट्रीय राजधानी ब्राझिलियाच्या २१० किमी नैऋत्येस स्थित असून कॅनडामधील एडमंटन खालोखाल ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर मानले जाते. २०१४ साली गोयानियाची लोकसंख्या १४.१२ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार गोयानिया ब्राझीलमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोयानिया
या विषयातील रहस्ये उलगडा.