गोखरू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गोखरू

सराटा किंवा काटे गोखरू (शास्त्रीय नाव: Tribulus terrestris (ट्रिबुलस टेरेस्ट्रिस), (हिंदी: गोखरू), (संस्कृत: गोक्षुर), इंग्रजी:land caltrops लँड कॅलट्रॉप्स) ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरुवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढऱ्या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. सराट्याची मुळे पांढऱ्या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात.

लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →