व्याख्या :-
गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत –
विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो.
या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणून व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.
मूळव्याध
या विषयातील रहस्ये उलगडा.