गांधी, माय फादर हा २००७ मध्ये प्रदर्शित झालेला फिरोज अब्बास खान दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे. हा अनिल कपूर निर्मित आहे आणि ३ ऑगस्ट २००७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात दर्शन जरीवाला (महात्मा गांधी), अक्षय खन्ना (हरिलाल), भूमिका चावला (गुलाब गांधी, हरिलालची पत्नी) आणि शेफाली शाह (कस्तुरबा गांधी) यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचे जेष्ठ पुत्र हरिलाल गांधी यांच्यातील अडचणीच्या नात्याचा उलगडा करतो. हा चित्रपट चंदुलाल भागुभाई दलाल यांनी लिहिलेल्या हरिलाल गांधी: अ लाईफ या हरिलाल गांधींच्या चरित्रावर आधारित आहे. फिरोज खान यांचे नाटक, महात्मा विरुद्ध गांधी, हा चित्रपटापेक्षा वेगळे असला तरी, त्याचा विषय गुजराती लेखक दिनकर जोशी यांच्या कादंबरीवर आधारित होती. हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेत आणि मुंबई आणि अहमदाबादसह अनेक भारतीय शहरांमध्ये चित्रित करण्यात आला होता.
गांधी, माय फादर
थोडक्यात पण महत्त्वाचे.