गरुडा इंडोनेशिया (इंडोनेशियन: Garuda Indonesia) ही आग्नेय आशियातील इंडोनेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४९ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी जगातील एक आघाडीची विमानकंपनी मानली जाते. गरुडा इंडोनेशियाचे मुख्यालय जाकार्ताजवळील तांगेरांग येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. २०१४ पासून गरुडा इंडोनेशिया स्कायटीमचा सदस्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गरुडा इंडोनेशिया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?