इंडोनेशिया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इंडोनेशिया

इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..

हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.

जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.

इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →