गणनात्मक भाषाशास्त्र किंवा संगणकीय भाषाशास्त्र ही संगणकाद्वारे भाषेचे विश्लेषण व संश्लेषण करणारी उपयोजित भाषाविज्ञानाची एक शाखा आहे. साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी यांत्रिक भाषांतराची सुरुवात झाली तेव्हापासून संगणकीय भाषाविज्ञान तीव्रतेने वाढत आणि विकसित होत आहे. भाषेच्या संगणकीय आणि औपचारिक घडणीतून या क्षेत्राचा सैद्धांतिक विकास झाला आहे. या प्रक्रियेत भाषेच्या अनुप्रयोगात आणि उपयोगात बरीच वाढ झाली आहे. संगणकीय भाषाविज्ञान हा ‘नैसर्गिक भाषा प्रक्रियेसाठी’ प्रतिशब्द सुद्धा मानला जाऊ शकतो. याचे कारण असे की संगणकीय भाषाविज्ञानाचे मुख्य कार्य नैसर्गिक भाषेमध्ये पाठावर प्रक्रिया करून संगणकीय आज्ञावलीची (प्रोग्रॅमची) रचना करणे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणनात्मक भाषाशास्त्र
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.