खेमकरण

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

खेमकरण (पंजाबी:ਖੇਮਕਰਨ ) हे भारताच्या पंजाब राज्यातील तरण तारण जिल्ह्यातील एक गाव आहे. इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान येथे भारत व पाकिस्तानाच्या सैन्यांच्या रणगाड्यांच्या तुकड्यांमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईमुळे याचे नाव रणगाड्यांची दफनभूमीअसे पडले.

इ.स. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांचे एक प्रमुख युद्ध होते. या युद्धामुळे, युद्ध झालेल्या स्थानी म्हणजेच खेमकरण येथे 'पॅटन नगर'ची स्थापना झाली. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याने वापरलेले पॅटन रणगाडे या ठिकाणी काबीज केले गेले अथवा निकामी केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →