खलील जिब्रान (Kahlil/Khalil Gibran; अरबी : جبران خليل جبران / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जन्म : सीरिया, ६ जानेवारी १८८३; - १० एप्रिल १९३१]) हा लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. १८९५ ते १८९७ या काळात तो आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे राहत होता. १८९७ ते १९०३ मध्ये पुन्हा सीरियात पुन्हा राहून त्यामे बैरूटच्या अल् हिकमत पाठशाळेत अध्ययन केले. . १९०३ ते १९०८ तो अमेरिकेत आला. १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१२ ते १९३१ या कालावधीत, म्हणजे मृत्यूपर्यंत त्याचे वास्तव्य न्यू यॉर्कमध्ये होते.
खलील जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते. इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या थंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलील जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.
खलील जिब्रान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!