खंड्या किंवा किलकिल्या (शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis ; इंग्लिश: White Breasted Kingfisher, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ राहणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहेत. तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.
खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढऱ्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या , कवडा खंड्या , काळ्या डोक्याचा खंड्या , तिबोटी खंड्या , घोंगी खंड्या , मलबारी खंड्या अशी आहेत.
खंड्या
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.