काळ्या डोक्याचा खंड्या

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

काळ्या डोक्याचा खंड्या

काळ्या डोक्याचा खंड्या (शास्त्रीय नाव: Halcyon pileata, हॅल्सायन पायलीटा ; इंग्लिश: Black-capped Kingfisher, ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर ;) ही धीवराद्य पक्षिकुळातील दक्षिण आशिया, पूर्व आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक प्रजाती आहे. हे साधारणपणे २८ ते ३० सें. मी. लांबीचे पक्षी असून यांचा रंग पाठीकडून गडद निळा असतो. यांचा पोटाकडून छातीचा भाग पांढरा, तर खालील भाग लालसर पिवळा असतो. यांच्या डोक्यावर मखमली काळी टोपी आणि गळ्यापासून मानेपर्यंत पांढरी पट्टी असते, तर चोच लाल रंगाची असते. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.हा पक्षी कमी प्रमाणात दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →