छोटा कंठेरी चिखल्या किंवा कंठेरी चिलखा (शास्त्रीय नाव: Charadrius dubius, कॅरेड्रियस डूबियस ; इंग्लिश: Little Ringed Plover, लिटल रिंग्ड प्लोवर ;) हा टिट्टिभाद्य कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. याला मराठीत टीटवा, चुरकी, टिंबूल किंवा लहान तवी या नावांनीही ओळखतात. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय पिवळे, जाड गोल डोक्याचा, कान आणि डोळ्यांभोवती गडद काळा भाग त्यात पिवळ्या रंगाची उठावदार चकती, विणीच्या काळात नराचा कंठ काळा असतो. यावरून याला छोटा कंठेरी चिखल्या असे नाव पडले. एरवी नराचा आणि मादीचा कंठ फिकट तपकिरी असतो.
याच्या रंग-आकारमानावरून किमान तीन उपजाती आहेत.
छोटा कंठेरी चिखल्या
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.