क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे बुलावायो, झिम्बाब्वे येथील एक मैदान आहे. मुख्यतः ते क्रिकेट स्पर्धांसाठी वापरले जाते. मैदानाची कमाल प्रेक्षकक्षमता १३,००० इतकी आहे. वर्तमान लोगान स्पर्धेचे विजेते माताबेलेलॅंड टस्कर्स या टीमचे ते घरचे मैदान आहे. बुलावायोमध्ये बुलावायो ॲथलेटिक क्लब हे आणखी एक क्रिकेटचे मैदान आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लबनंतर क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेमधले दुसरे मैदान आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागात असून आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट्साठीच्या अतिशय सुंदर अशा मैदानांपैकी एक समजले जाते. ह्याचे जुने पॅव्हेलियन वृक्षांनी वेढलेले आहे, त्यामुळे मैदानातील प्रेक्षकांना सावली मिळते. ऑक्टोबर १९९४ मध्ये क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेचे तिसरे कसोटी ठिकाण बनले.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.