क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CAN, आप्रविको: ZGGG) हा चीन देशाच्या क्वांगचौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१४ साली क्वांगचौ बैयून विमानतळ चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा (बीजिंगखालोखाल) तर जगातील १५व्या क्रमांकाचा विमानतळ होता.

एर चायना, चायना सदर्न एरलाइन्स, षेंचेन एरलाइन्स व चायना ईस्टर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब असलेला क्वांगचौ बैयून ५ ऑगस्ट २००४ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला. येथील जुन्या विमानतळाच्या ५ पट मोठ्या असलेल्या ह्या नव्या विमानतळाच्या बांधकामासाठी १,९८० कोटी रेन्मिन्बी इतका खर्च आला. हा विमानतळ क्वांगचौ शहरकेंद्रापासून २८ किलोमीटर (१७ मैल) उत्तरेस स्थित असून क्वांगचौ मेट्रोद्वारे तो शहरासोबत जोडला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →