क्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

क्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ

क्रिकेट विश्वचषक, २०१९ साठी निवडल्या गेलेल्या संघांची ही यादी आहे. सर्व १० संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंची नावे २३ एप्रिल पर्यंत सादर करणे गरजेचे होते, तर संघांतील बदल २२ मे पर्यंत करण्यास परवानगी आहे. ३ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर करून सर्वप्रथम विश्वचषक संघ जाहीर करण्याचा मान न्यू झीलंडने मिळवला. वेस्ट इंडीजने सर्वात शेवटी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवसानंतर, २४ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर केला.

न्यू झीलंडचा टॉम ब्लंडेल आणि बांग्लादेशचा अबू जायेद हे दोन क्रिकेट खेळाडू, त्यांची नावे विश्वचषक संघात निवडली जाण्याआधी एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले नव्हते. १३ मे २०१९ रोजी, जाएदने बांग्लादेशतर्फे वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड मधील तिरंगी मालिकेच्या पाचव्या सामन्यात पदार्पण केले. इंग्लंडचा आयॉन मॉर्गन, वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा मशरफे मोर्तझा, ह्या तीन कर्णधारांनी आधीच्या स्पर्धेत स्वतःच्या संघांचे नेतृत्व केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →