क्रिकेट विश्वचषक, १९९२ - अंतिम सामना

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अंतिम सामन्यात पाकिस्तानी महान खेळाडू इम्रान खान व जावेद मियांदादने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे, पाकिस्तान संघाने इंग्लंड संघासमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

साखळी सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघास ७४ धावात बाद केले होते, अंतिम सामन्याची सुरुवात काही प्रकारे तशीच झाली. डेरेक प्रिंगलने दोन्ही पाकिस्तानी ओपनर फलंदाजांना २४ धावातच तंबूत परत पाठवले.परंतु, इम्रान खान व जावेद मियांदादने संयमी खेळ केला. सामन्यातील एक महत्त्वपुर्ण घटना तेव्हा झाली जेव्हा ग्रॅहम गूचने इम्रान खान ९ धावांवर खेळत असतांना झेल सोडला. इम्रानने सामन्यात ७२ धावा केल्या. २५ षटके होइ पर्यंत पाकिस्तान संघाने ७० धावा केल्या होत्या. इंजमाम (४२) व अक्रम (३५) ह्यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने इंग्लंड साठी २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडची सुरुवात खराब झाली, ६९ धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. ऍलन लॅंब व नील फेअरब्रदरने ७२ धावांची भागीदारी केली. परंतु वसिम अक्रमने ३५ षटकात ऍलन लॅंब व क्रिस लेविसला बाद केले. पाकिस्ताने अंतिम सामना २२ धावांनी जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →