क्रमगुणित

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गणितामध्ये कोणत्याही ऋण नसलेल्या पूर्णांकाचा nचा क्रमगुणित (factorial- फॅक्टोरियल) हा n! ने दर्शवतात.क्रमगुणित म्हणजे ती संख्या व तिच्यापेक्षा लहान धन पूर्णांकाचा गुणाकार होय.



n! = n . (n-१) . (n-२) . (n-३) . (n-४) ..... ४ . ३ . २ . १



उदाहरणार्थ,



५! = ५ . ४ . ३ . २ . १ = १२०



याचा उपयोग बीजगणित, मांडणी व जुळवणी मध्ये केला जातो.

०!चे मूल्य! १ आहे.

कारण,



⇒n!=n×(n−१)!

समजा nची किंमत १ धरल्यास,

⇒१!=१!×(१−१)!

⇒१!=१!×(०)!



डावी बाजू = उजवी बाजू असले पाहिजे,

हा नियम पूर्ण होण्यासाठी, ०! = १ असणे हे गरजेचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →