कौंडिण्यपूर (पूर्वीचे कुंडीनपूर) हे भारतातील सध्याच्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील (तह.- तिवसा) खेडे होते. या ठिकाणी, श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर असल्याचे मानतात.
येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा ४००हून अधिक वर्षे जुनी आहे.
हे ठिकाण विदर्भनंदन राज्याच्या राजधानीचे शहर होते. रामाची आजी/ अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर कौंडिण्यपूर हे होते.
नल व दमयंतीचा विवाह हा येथेच झाला.
येथील अंबिका मंदिरातूनच श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका आहे.
कौंडिण्यपूर
यामागील विज्ञान आणि इतिहास.