कैकाडी ही भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश गुजरात, तेलंगणा, केरळ, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश एकूण १४ राज्यात आढळते. एक भटकी विमुक्त जात आहे. ते मुळचे आंध्र प्रदेशचे /तामीळनाडूचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्रात आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत.
तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात.
मध्य महाराष्ट्रात जालना, औरंगाबाद, बीड, येथे त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. येथे २ पोटजाती प्रामुख्याने आढळतात.
त्यात १)गावकैकाडी जे की शेतीसाठी / घरगुती कामासाठी लागणारे टोपल्या, (डाल) धान्य साठवण्यासाठी कणींग इ. विणण्याचे काम करतात असत. हा व्यवसाय आधुनिकीकरणाच्या काळात पूर्ण पणे बंद झाला असल्याने हे व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
या पोटजातीत त्यांची नावे जाधव, गायकवाड अशी आहेत. यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण हे चांगले आहे. त्यानंतर दुसरी पोटजात आहे: २) धोंतले यामध्ये त्यांची नावे आहेत.. पवार, जाधव, गायकवाड, माने.
यांचा व्यवसाय टोपली, ताटी, विनणे होता.
आता हळूहळू शैक्षणिक प्रगती होत असल्याने पूर्वीचे परंपरागत व्यवसाय सोडून हा समाज आता इतर व्यवसाय करत आहे. कश्यप, सातपाडी, कवाडी, मेंढरगुत्ती असे गोत्र आढळतात.
कैकाडी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.