केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)

केशरी मार्गिका ५ आणि १२ (मुंबई मेट्रो) किंवा ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-तळोजा मार्गिका ही भारताच्या मुंबई शहरातील मेट्रो प्रणालीचा भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे.

२४.९ किमी लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकेवर १७ स्थानके असणार आहेत आणि त्यासाठी रू. ८,४१६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असेल. हे ठाणे पूर्व उपनगरातील भिवंडी आणि कल्याणला जोडेल. या मार्गिकेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी मान्यता दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने डिसेंबर २०१७ पर्यंत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. भिवंडीतील काही दुकानदार व रहिवाशांच्या निषेधामुळे सर्वेक्षण कामात अडथळा निर्माण झाला होता.

केशरी मार्गिका १२ ची एकूण लांबी २०.७५ किलोमीटर (१२.८९ मैल) करण्याचे नियोजित आहे आणि मार्ग पूर्णपणे उन्नत असेल. बांधकामासाठी एकूण ४,१३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो मार्गाला एमएमआरडीएने मान्यता दिली. या मार्गावर १८ स्थानके असतील. दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो मार्गाला लाल झेंडा दाखविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →