केरळ

या विषयातील रहस्ये उलगडा.

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →