केफ्लाविक विमानतळ तथा रेक्याविक-केफ्लाविक विमानतळ ( आईसलँडिक: Keflavíkurflugvöllur [ˈcʰɛplaˌviːkʏrˌflʏɣˌvœtlʏr̥] ) (आहसंवि: KEF, आप्रविको: BIKF) हा आइसलँडची राजधानी रेक्याविकजवळील विमानतळ आहे. हा देशातील सर्वात मोठा विमानतळ आहे. केफ्लाविक विमानतळ केफ्लाविकच्या पश्चिमेस ४.१ किमी अंतरावर आहे तर आणि रेक्याविक शहरापासून ५० किमी वर आहे. या विमानतळावर तीन धावपट्ट्या आहेत, त्यापैकी दोन वापरात आहेत. आणि विमानतळाचे क्षेत्रफळ सुमारे २५ चौ. किमी (१० चौ. मैल) आहे.
आइसलँडएर या विमानकंपनीचे मुख्य ठाणे येथे आहे.
केफ्विलाविक मानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी केला जातो. सर्व देशांतर्गत उड्डाणे रेक्याविकच्या मध्यवर्ती भागात रेक्याविक विमानतळावरुन होतात. केफ्लाविक विमानतळ इसाव्हिया या सरकारी उपक्रमाद्वारे चालवले जाते.
केफ्लाविक आंतरराष्ट्रीय विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!