केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPT, आप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.