कॅथरीन दे मेदिची

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कॅथरीन दे मेदिची

कॅथरीन दे मेदिची (इटालियन: कॅतेरिना दे मेदिची; फ्रेंच: कॅथरीन दि मेदिसिस; १३ एप्रिल, १५१९ - ५ जानेवारी, १५८९) ही फ्रांसचा राजा दुसऱ्या हेन्रीची पत्नी आणि त्याद्वारे १५४७ ते १५५९ दरम्यान फ्रांसची राणी होती. ही फिरेंझेच्या मेदिचे घराण्यातील असून तिची तीन मुले फ्रांसचे राजे झाले. कॅथरीन दुसरा फ्रांस्वा, नववा शार्ल, आणि तिसरा हेन्री यांची आई तसेच आणि पोप क्लेमेंट सातवा यांची चुलतबहीण होती. तिच्या मुलांच्या सत्ताकालाला कॅथरीन दे मेदिचीचा काळ म्हटले जाते कारण तिचा फ्रांसच्या राजकीय जीवनावर व्यापक प्रभाव होता.

कॅथरीनचा जन्म फिरेंझेमध्ये उर्बिनोचा ड्यूक लॉरेंझो दि पिएरो दे मेदिचीआणि मॅडेलीन दि ला तूर दॉव्हर्न्ये यांच्या पोटी झाला. १५५३ साली वयाच्या १४ व्या वर्षी कॅथरीनचे लग्न फ्रांसचा राजा पहिल्या फ्रांस्वाचा दुसरा मुलगा हेन्रीशी झाले. कॅथरीनचे लग्न तिच्या चुलतभाऊ असलेल्या पोप क्लेमेंटने ठरवले होते. पुढे जाता हेन्री राजा झाल्यावर त्याने कॅथरीनला राज्य कारभारातून लांब ठेवले. हेन्रीची उपपत्नी डायेन दि प्वॉतियेशी तो मसलत करीत असे. १५५९ मध्ये झालेल्या हेन्रीच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे कॅथरीन १५ वर्षांच्या नाजुक तब्येतीच्या दुसऱ्या फ्रांस्वाची आई म्हणून राजकारणात आली. दोन वर्षांत फ्रांस्वाचा मृत्यू झाल्यावर तिचा १० वर्षांचा दुसरा मुलगा नववा चार्ल्स नावाने राजा झाला व कॅथरीन मुलाच्या वतीने कारभार चालवू लागली. यानंतर कॅथरीनने दरबाराव पकड मिळवली. पुढे १५७४ मध्ये चार्ल्सच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा तिचा तिसरा मुलगा हेन्री तिसरा राजा झाला. याच्या कारकिर्दीत कॅथरीनला मोठे महत्त्व होते. त्याने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यांतच तिचा सल्ला नाकारला पण कॅथरीन नंतर सातच महिन्यांत त्याचाही मृत्यू झाला.

अनेक इतिहासकार कॅथरीनला १६ व्या शतकातील युरोपमधील सर्वात महत्वाची महिला समजतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →