अरागॉनची कॅथरीन (स्पॅनिश मध्ये कॅथरीना किंवा कॅटलीना; १६ डिसेंबर १४८५ - ७ जानेवारी १५३६) ही राजा हेन्री आठव्याची पहिली पत्नी म्हणून इंग्लंडची राणी होती. ११ जून १५०९ रोजी त्यांच्या लग्नापासून ते २३ मे १५३३ रोजी त्यांचे लग्न रद्द होईपर्यंत ही राणी होती. हीचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. हेन्रीचा मोठा भाऊ आर्थर, प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी त्याच्या मृत्यूपूर्वी थोड्या काळासाठी विवाहित असताना ती वेल्सची राजकुमारी होती.
कॅस्टिलच्या पहिली इसाबेला आणि अरॅगॉनच्या दूसऱ्या फर्डिनांडची ही मुलगी होती. कॅथरीन तीन वर्षांची होती जेव्हा तिचे आर्थरशी लग्न ठरले, जो इंग्लंडच्या सिंहासनाचा वारस होता . त्यांनी १५०१ मध्ये लग्न केले, परंतु पाच महिन्यांनंतर आर्थरचा मृत्यू झाला. कॅथरीनने अनेक वर्षे संभ्रमात घालवली आणि या काळात, तिने १५०७ मध्ये इंग्लंडमध्ये अरागॉनचे राजदूत म्हणून काम केले. युरोपियन इतिहासातील ती पहिली महिला राजदूत होती. १५०९ मध्ये हेन्रीच्या राज्यारोहणानंतर तिने हेन्रीशी लग्न केले. १५१३ मध्ये सहा महिने, हेन्री फ्रान्समध्ये असताना तिने इंग्लंडचे रीजेंट म्हणून काम केले. त्या काळात इंग्रजांनी फ्लॉडनच्या लढाईत स्कॉटिश आक्रमणाचा पराभव केला. ह्या लढाईत कॅथरीनने धैर्य आणि देशभक्तीबद्दल भावनिक भाषणाद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
१५२६ पर्यंत, हेन्री ॲन बुलिनवर मोहित झाला आणि कॅथरीनसोबत लग्न कोणीही हयात मुलगे झाले नसल्याबद्दल तो असमाधानी होता. त्या काळात सिंहासनावर स्त्रीची कोणतीही प्रस्थापित उदाहरणे नव्हती व अशा वेळी त्यांची मुलगी मेरीला वारस करण्यावाचून त्याला पर्याय नव्हता. त्याने त्यांचे कॅथरीनसोबतचे लग्न रद्द करण्याचा प्रयत्न केला. ह्यामुळे कॅथोलिक चर्चसह इंग्लंडचे मतभेद सुरू झाले. जेव्हा पोप क्लेमेंट सातव्याने विवाह रद्द करण्यास नकार दिला तेव्हा हेन्रीने इंग्लंडमधील धार्मिक बाबींवर स्वतःचे वर्चस्व गाजवले. १५३३ मध्ये त्यांचे लग्न अवैध घोषित करण्यात आले आणि हेन्रीने पोपचा संदर्भ न घेता ॲनशी लग्न केले. कॅथरीनने हेन्रीला इंग्लंडमधील चर्चचे सर्वोच्च प्रमुख म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि स्वतःला राजाची हक्काची पत्नी आणि राणी मानले. ह्यामुळे तिच्याबद्दल लोकांची सहानुभूती वाढली. असे असूनही, हेन्रीने तिला फक्त वेल्सची राजकन्या म्हणून स्वीकारले, जे पद तिला तिच्या पहिल्या विवाहातून मिळाले होते. हेन्रीने तिला हद्दपार केल्यानंतर, कॅथरीनने तिचे उर्वरित आयुष्य किंबोल्टन कॅसलमध्ये व्यतीत केले व जानेवारी १५३६ मध्ये कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. इंग्लिश लोकांनी कॅथरीनचा उच्च आदर केला आणि तिच्या मृत्यूने प्रचंड शोक व्यक्त केले. तिची मुलगी मेरी १५५३ मध्ये पहिली निर्विवाद इंग्लिश राणी बनली.
कॅथरीनने जुआन लुईस व्हिव्हस यांना द एज्युकेशन ऑफ ए ख्रिश्चन वुमनची ह्या पुस्तकासाठी पाठबळ दिले. त्यांनी १५२३ मध्ये हे पुस्तक कॅथरीनला समर्पित केले व वादग्रस्त मुद्दा बनवली. कॅथरीनची लोकांवर अशी छाप होती की तिचा शत्रू थॉमस क्रॉमवेल देखील तिच्याबद्दल म्हणाला, "ती एक स्त्री नसती तर ती इतिहासातील सर्व नायकांचा अवमान करू शकली असती."
अरागॉनची कॅथरीन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.