ब्रगांझाची कॅथेरीन ( पोर्तुगीज: Catarina de Bragança; २५ नोव्हेंबर, १६३८:व्हिला व्हिसोसा, पोर्तुगाल - ३१ डिसेंबर, १७०५:बेम्पोस्ता महाल, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही इंग्लंडच्या दुसऱ्याचार्ल्सची राणी होती व त्याद्वारे ती इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होती.
कॅथेरीन पोर्तुगालच्या चौथ्या होआवची मुलगी होती. चार्ल्सच्या मृत्यूनंतर कॅथरीन पोर्तुगालला परतली आणि तिचा भाऊ पेद्रो दुसरा अनुपस्थित असताना १०७ आणि नंतर परत १७०४-०६ दरम्यान पोर्तुगालची कारभारीण होती.
कॅथरीनला मुले नव्हती. तिचे तीन गर्भपात झाले. तिच्या पतीने अनेक उपवस्त्रे ठेवली होती. यांपैकी बार्बरा पामर, क्लीव्हलँडची पहिली डचेस हिला कॅथरीनने आपल्या महालातील सोबतीण म्हणून स्वीकारणे भाग पाडले गेले. या बायकांद्वारे चार्ल्सला अनेक मुले झाली.
कॅथेरीन आणि चार्ल्सच्या लग्नाचा भारताच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या तद्नंतरच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाला. लग्नात हुंडा म्हणून मिळलेली मुंबईची सात बेटे चार्ल्सने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली. कंपनीने आपले मुख्यालय तेथे हलविले. कालांतराने मुंबई हे भारतातील मुख्य शहरांपैकी एक झाले.
कॅथेरीनला ब्रिटनमध्ये चहा पिणे प्रचलित केल्याचे श्रेय दिले जाते. याशिवाय तिने ऊस, लाख, कापूस आणि चिनी मातीच्या वस्तूं वापरात आणल्या. याने इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांत चव, शिष्टाचार आणि कारागिरीत मोठे बदल घडून आले.
ब्रगांझाची कॅथेरीन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.