कुरितिबा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कुरितिबा

कुरितिबा (पोर्तुगीज: Curitiba) ही ब्राझील देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझीलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय स्थान आहे.

१९व्या शतकाच्या मध्यापासून वेगाने वाढत असलेल्या कुरितिबाला रीडर्स डायजेस्ट ह्या मासिकाने ब्राझिलमधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर असे गौरविले आहे. कुरितिबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा बायशादा ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →