कीर्ति कुल्हारी (जन्म:३० मे, १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने २०१० मध्ये खिचडी: द मूव्ही आणि त्यानंतर जून, २०११ मध्ये शैतान या बॉलीवूड चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर तिने जल (२०१३), पिंक (२०१६), इंदू सरकार (२०१७), ब्लॅकमेल (२०१८), उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९), मिशन मंगल (२०१९) आणि शादीस्थान (२०२१) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात काम केले आणि समीक्षकांकडून प्रशंसा देखील प्राप्त केली. २०१८-१९ पासून कीर्ति कुल्हारी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीच्या नावांपैकी एक म्हणून समोर आली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कीर्ति कुल्हारी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.