किशोरी गोडबोले एक मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. ती मराठी गायक जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे. तिला मिसेस तेंडुलकर मध्ये विभावरी सुहास तेंडुलकर या भूमिकेसाठी ओळखले जाते. झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सचिन पिळगांवकर यांच्या हद कर दी या टीव्ही मालिकेत तिने शोभा ही भूमिका साकारली होती. सध्या ती सोनी टीव्हीच्या मेरे साई - श्रद्धा और सबुरी या शोमध्ये बायजा माची भूमिका करत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किशोरी गोडबोले
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.