किम क्लाइस्टर्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

किम क्लाइस्टर्स

किम क्लाइजस्टर्स (डच: Kim Clijsters, उच्चार-[kɪm ˈklɛistərs]) ही बेल्जियम देशाची एक टेनिसपटू आहे. क्लाइजस्टर्सने आजवर आपल्या कारकिर्दीत चार ग्रँडस्लॅम व एकूण ४१ महिला एकेरी टेनिस स्पर्धा तसेच २ महिला दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

१९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या क्लाइजस्टर्सने २००७ साली निवृत्ती जाहीर केली. परंतु २ वर्षांनंतर ऑगस्ट २००९ मध्ये तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले व पुनरागमनात ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. इव्होन गूलागॉंगनंतर आई बनल्यावर ग्रँड स्लॅम जिंकणारी क्लाइजस्टर्स पहिलीच टेनिस खेळाडू आहे. २०११ मध्ये एका आठवड्यासाठी डब्ल्यूटीए यादीत अव्वल राहिल्यानंतर क्लाइजस्टर्स सध्या नवव्या क्रमांकावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →