रफायेल नदाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रफायेल नदाल

रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे.

रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →